कृष्णावताराची व्युहरचना

महाभारताच्या शांती पर्वात नारायणीय धर्म सांगितला आहे. हा धर्म प्रथम भगवंताने अर्जुनाला सांगितला मग तो नारदालाही विषद केला. यात विचार करायला लावणारी व्युह कल्पना मांडली आहे. वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध हे चार मिळून चतुर्व्युह होते.यात
१. वासुदेव - हा परमात्मा व सकल सृष्टीचा कर्ता
२.
संकर्षण - त्याचेच दुसरे रूप, प्राणिमात्राचे प्रतिनिधी
३.
प्रद्युम्न - संकर्षणापासून उत्पत्ती म्हणजे मन
४. अनिरुद्ध -
प्रद्युम्नापासून उत्पन्न म्हणजे तो अहंकार
हे चार नारायणच होत. वासुदेव कल्पारंभी. स्वतःच्या अव्यक्त मुल प्रकृतीलाच उत्पन्न करत नाही तर तिच्याबरोबर संकार्षानात्मक विशिष्ट जीव तो निर्माण करतो. संकर्षण आणि प्रकृती यांच्या संयोगातून मन प्रकट होते. हे मन म्हणजेच
प्रद्युम्न होय. यापासून अनिरुध्द्धाची म्हणजेच अहंकाराची उत्पत्ती होते. त्याच्या पुढे महाभूते व त्यांचे गुण उत्पन्न होतात. त्याचवेळी ब्रह्माचीही उत्पत्ती होते आणि तो तत्वांच्या सामग्रीने भूतसृष्टीची रचना करतो.
हि सर्व व्युह रचना पाहिल्यावर लक्षात येते कि, मूळ हे वर आहे आणि शाखा खाली आहेत. हाच अश्वस्थ होय. मनुष्याने मुळाकडे जायला हवे. शाखापल्लावामधेच जे अडकून पडतात ते नियतीच्या तडाख्यात सापडतात. मन हि ईश्वराची विभूती आहे. आपल्याला ईश्वराचेच प्रारब्ध व्हायला हवे- म्हणजे काल्पावातारात तादात्म्य पावले कि हा भवसागर तरुन जाता येईल.