काय मागितले? काय मिळाले?
मी त्याच्या जवळ शक्ती मागितली
त्याने मला संकटे दिली.... मला बलवान होण्यासाठी
मी शहाणपण मागितले
त्याने मला समस्या दिल्या .... चिकाटी वाढवण्यासाठी
मी ऐश्वर्य मागितले
त्याने मला ताकद दिली ... काम करण्यासाठी
मी धाडस मागितले
त्याने मला अडथळे दिले... नेटाने पुढे जाण्यासाठी
मी त्याच्याकडे प्रेम मागितले
त्याने मला कृतघ्नता दाखवली ... प्रेमाची कसोटी तपासण्यासाठी
मी मेहेरबानी मागितली
त्याने मला संधी उपलब्ध करून दिल्या
मी जे जे मागितले ... ते मला मिळाले नाही
पण ज्याची मला गरज होती .. ते सर्व काही मला मिळाले.
जे मिळाले ते काय आहे
हे बघण्याची दृष्टीसुद्धा त्यानेच मला दिली
त्यासाठी मी त्याची आभारी आहे.